बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या घरी पाळणा हलणार असल्याची बातमी खुद्द सैफनेच काही दिवसांपूर्वी केली. यावर्षी डिसेंबरमध्ये करिना गोड बातमी देईल.
सैफिनाच्या घरी पाळणा हलणार असल्याची बातमी कळल्यानंतर बॉलीवूडकरांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण त्यांच्या या गोड बातमी सैफची पहिली पत्नी अमृता सिंगला फारसा आनंद झालेला नाही. एका संकेतस्थळाने याविषयी वृत्त दिले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर एका पत्रकाराने अमृताशी फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अमृता त्या पत्रकारावर ओरडली. लोकांना फोन करून असे प्रश्न विचारण्याची तुम्हाला हिंमतच कशी होते? कोण आहेस तू? यापुढे मला फोन करू नको, असे संतप्तपणे अमृता म्हणाली.
अमृता सिंग ही सैफची पहिली पत्नी होती. यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफने २०१२ साली करिनाशी विवाह केला.