आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या अमृता ‘खतरों के खिलाडी १०’ मध्ये दिसत आहे. याच शो निमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने बिग बॉसमध्ये सहभागी न होण्या मागचे कारण सांगितले आहे.

अमृताने नुकताच तिचा खतरों के खिलाडी पर्व १० या कार्यक्रमातील अनुभव स्पाटबॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केला. दरम्यान तिला बिग बॉसशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने माझ्या नवऱ्याने हिमांशूने मला त्या शोमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिलेली नाही असे उत्तर दिले. तिचे हे उत्तर ऐकून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहे.

 

View this post on Instagram

 

Outfit @paparazzicloset Styled by @nehachaudhary_ makeup by @digambar103 @ipshita.db

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिमांशू हा खूप वेगळा व्यक्ती आहे. त्याला घरात वादविवाद झालेले आवडत नाहीत आणि मी एका शोमध्ये जाऊन ते करणं फार लांबची गोष्ट आहे. यंदाच्या बिग बॉसचे पर्व खूप छान होते. त्यामुळे मी हिमांशू नसताना ते पाहायचे आणि तो येताच क्षणी चॅनेल बदलायचे’ असा खुलासा अमृताने केला.