आर्यन खानमुळे अनन्या पांडेही अडचणीत?; NCB ने फोन घेतला ताब्यात; चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स

एनसीबीच्या पथकाने त्यांच्यासोबत अनन्याच्या घरातून काही वस्तूही घेतल्या आहेत

Ananya Pandey phone in NCB possession Summons to be present in the office for questioning
(Source: ananyapanday/Instagram)

गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील घेतल्या आहेत. त्याचबरोबर अनन्याला आज दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामिनासाठी २६ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. यानंतर एनसीबी पथक अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. एनसीबीने आर्यन खानसोबत काही नवीन अभिनेत्रींशी गप्पा मारल्याच्या बातम्या आल्या होत्या.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीचे एक पथक गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचले आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता अनन्या पांडेचा फोन घेतला आहे. तिला मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या संदर्भात चौकशी एजन्सीने दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

दरम्यान, शाहरुखच्या बंगल्यातून परतत असताना, एनसीबीच्या पथकाने माध्यमांशीही संवाद साधला. अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलवण्याबाबत एनसीबीचे अधिकारी म्हणाले, ‘संशयित आणि साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावले जाते. एखाद्याला चौकशीसाठी बोलावणे याचा अर्थ असा नाही की तो आरोपी आहे.

शाहरुख खानच्या घरी पोहोचलेल्या एनसीबी पथकाने आर्यनचे इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट त्यांच्याकडे असल्यास देण्यास सांगितले. एनसीबीने अनन्याचा फोन त्यांच्याकडे ठेवला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हाला अशा प्रकरणांमध्ये अनेक लोकांची चौकशी करावी लागेल. अनन्या पांडेला चौकशीसाठी आज दोन वाजता एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ananya pandey phone in ncb possession summons to be present in the office for questioning abn

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या