अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉकअप’ शो सध्या सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. नुकतीच या शोच्या मंचावर कंगनाची मैत्रीण अंकिता लोखंडेनंही हजेरी लावली होती. यावेळी कंगनानं अंकिताला, या शोमध्ये सर्वजण आपली गुपितं शेअर करतात तर तुलाही यावेळी असं करावं लागेल असं सांगितलं. जेव्हा कंगनानं अंकिताला एक गुपित शेअर करण्यास सांगितलं, त्यावेळी अंकिता म्हणाली की याबाबत तिनं अद्याप पती विकीलाही काहीच सांगितलेलं नाही आणि अंकितानं जे काही सांगितलं ते ऐकल्यावर कंगनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.

कंगनाला अंकिताचं गुपित ऐकून एवढा आनंद झाला की तिनं आनंदाच्या भरात तिला मिठी मारली. दरम्यान अंकितानं ‘लॉक अप’च्या मंचावर एक गुपित उघड करताना सांगितलं की, ‘मी प्रेग्नन्ट आहे.’ अंकिताचं बोलणं ऐकून कंगनाला खूप आनंद झाला आणि जेव्हा ही गोष्ट विकीला देखील माहीत नाही असं जेव्हा अंकिता म्हणाली तेव्हा तर कंगना चक्क जागेवर उठून उभी राहिली. ती चालत अंकिताकडे गेली आणि तिला मिठी मारली.

आणखी वाचा- रणबीर कपूर- आलिया भट्ट ‘या’ दिवशी घेणार सप्तपदी, लग्नाचं ठिकाणही ठरलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकितानं लोखंडेनं तिचं गुपित तर उघड केलं. पण लगेचच ती म्हणाली, ‘एप्रिल फूल’ अंकिता हसत हसत कंगनाला म्हणाली, ‘मी तुला एप्रिल फूल करत होते. खरं तर माझं आयुष्य एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे. ज्यात कोणतंही सीक्रेट नाही.’ अंकिताचं बोलणं ऐकून सर्वांनाच हसू आलं. दरम्यान अंकिता लोखंडेनं पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वाच्या प्रमोशनसाठी ‘लॉकअप’ शोच्या मंचावर हजेरी लावली होती. लवकरच या मालिकेचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.