scorecardresearch

एका दिवसासाठी ‘इतके’ लाख मानधन? रुपाली गांगुली ठरली छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री

‘अनुपमा’ या मालिकेत रुपाली मुख्य भूमिका साकारते.

anupamma, rupali ganguly,
'अनुपमा' या मालिकेत रुपाली मुख्य भूमिका साकारते.

छोट्या पडद्यावरील अनुपमा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रुपाली ही छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

रिपोर्टनुसार, रुपाली सुरुवातीला एका दिवसासाठी १ लाख ५० हजार रुपये मानधन घेत होती. आता रुपाली एका दिवसासाठी ३ लाख रुपये मानधन म्हणून घेते. रुपाली ही छोट्या पडद्यावरील सगळ्यातजास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

आणखी वाचा : “मुलगी आणि पत्नीसोबत पाहू शकत नाही असा चित्रपट…”, अल्लू अर्जुनचं वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : अमिताभ बच्चन आहेत क्रिप्टो किंग, १.६ कोटी रुपयांची गुंतवणुक करत कमावले ११२ कोटी रुपये

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली अभिनेत्रींमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते राम कपूर, रोनित बोस रॉय सारख्या कलाकारांपेक्षा जास्त मानधन घेते. तर अनुपमा मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुधांशु पांडे आणि गौरव खन्ना हे रुपालीच्या तुलनेत खूप कमी मानधन घेतात. असे म्हटले जाते की दोन्ही अभिनेत्यांना १.५ लाख रुपये मानधन म्हणून मिळतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anupamaa rupali ganguly creates history by charging lakhs per episode became the highest paid tv actress dcp