..म्हणून साध्या पद्धतीने साजरा झाला अर्जुनचा वाढदिवस!

या भावंडांच्या नात्यातील कडवटपणा दूर झाल्यामुळे सध्या ही चारही भावंड एकत्र दिसून येतात.

‘इश्कजादे’ या चित्रपटातून चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण करणारा अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत येत आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन आणि बोनी कपूर यांच्या परिवारातील अंत कमी झालं आहे. त्यामुळे सध्या जान्हवी, खुशी आणि अर्जुन या भावाबहिणींच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. या भावंडांच्या नात्यातील कडवटपणा दूर झाल्यामुळे सध्या ही चारही भावंड एकत्र दिसून येतात. सध्या या चौघांची चर्चा सुरु झाली असून त्याचं निमित्त आहे अर्जुनचा वाढदिवस. अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त त्याला जान्हवी, खुशीने सरप्राईज  दिलं असलं तरी त्याने वाढदिवसाचं सेलिब्रेशन न केल्याचं दिसून आलं.

तरुणींच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या अर्जुनने काल ३३ व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्ताने त्याला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी खुशी,जान्हवी आणि बोनी कपूर यांनी मध्यरात्री अर्जुनच्या घरी जाऊन त्याला सरप्राईज दिलं. इतकंच नाही तर जान्हवीनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अर्जुनबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याला भावनिक शुभेच्छा दिल्या. जान्हवीने शेअर केलेला हा फोटो सोनम कपूरच्या लग्नातला असून या फोटोमध्ये अर्जुन, खुशी, अंशूला आणि जान्हवी ही चारही भावंड पहिल्यांदाच एकत्र दिसून आले.

बोनी कपूर यांची चारही मुलं एकत्र आल्यामुळे यंदा अर्जुनचा वाढदिवस चांगला आणि उत्साहात साजरा होणार असं साऱ्यांना वाटत होतं. त्यामुळे अर्जुनच्या घरी एखाद्या मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं असेल असं त्याच्या चाहत्यांना वाटत होतं. मात्र चाहत्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली असून अर्जुनने त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला नाही. बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झाल्यामुळे अर्जुनने वाढदिवस सेलिब्रेट न करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, वाढदिवस सेलिब्रेट न करण्याचा निर्णय घेतलेल्या अर्जुनने त्याच्या चाहत्यांसाठी घराबाहेर येऊन केक कापला. त्यानंतर अर्जुनच्या मित्रांनी  त्याच्यासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या छोटेखानी पार्टीमध्ये अर्जुनसह वरुण धवन, नताशा, सिकंदर खेर, मोहित मारवाह, बादशाह, जाह्नवी कपूर आणि हर्षवर्धन उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Arjun kapoor cut cake with fans on his birthday

ताज्या बातम्या