अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रएलाने काही दिवसापूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. गॅब्रएलाने तिच्या प्रेग्नसी काळातले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे ती गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गॅब्रएला आई होऊन दोन महिने झाले असून ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. नुकतंच तिने एक नवीन बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंपैकी तिचा एक फोटो चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.

गॅब्रएलाने केलेल्या फोटोशूटमध्ये ती डेनिमच्या आउटफिटमध्ये दिसून येत आहे. हे फोटशूट करताना तिने लाईट मेकअप केला असून यात तिचं सौंदर्य खुलून येत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच आई झालेली गॅब्रएला या फोटोजमध्ये प्रचंड बारीक आणि सुंदर दिसत आहे. लवकरच येत आहे नव्या रुपात, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

@sashajairam #comingsoon new look who dis

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

दरम्यान, अर्जुन आणि त्याची पत्नी मेहर यांचा आद्यापही कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही. सध्या अर्जुन ‘द फायनल कॉल’ या वेब सिरीजमध्ये झळकणार असून ही सिरीज सायकोलॉजिकल थ्रिलर असणार आहे.