जोश, उत्साह, वेगळेपण जपण्याचा अट्टाहास, बदल घडवण्याची इच्छा आणि त्यादिशेने उठणारी पाऊले या सगळ्याचे एकत्रित मिश्रण म्हणजे तारूण्य… याच तरूणाईचा चित्रपट म्हणजे ‘युथ’…विक्टरी फिल्म्स प्रस्तुत आणि सुंदर सेतुरामन निर्मित युथ हा चित्रपट येत्या २० मे २०१६ ला प्रदर्शित होणार आहे. मै हूँ हिरो म्हणत मलिक घराण्याच्या ‘युथ’ ने हिंदी चाहत्यांना वेड लावले. आता तो मराठीमध्ये आपला चाहता वर्ग तयार करण्यासाठी सज्ज झाला आहे. युथ या चित्रपटासाठी अरमान ने एक गाणे गायले आहे जे लवकरच अरमानच्या चाहत्यांमध्ये भर घालणार आहे. याविषयी बोलताना अरमान म्हणाला…’माझा जन्म मुंबईत झाला आहे, मी या मायभूमीचे देणं लागतो. मराठी ही आपली राज्यभाषा आहे, ती मला तितकीशी बोलता येत नाही पण या भाषेत गाण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.’
हल्ली सामाजिक विषयांवर बरेच सिनेमे प्रदर्शित होत आहेत. समाजाप्रती बांधिलकी म्हणून सिनेनिर्माते समाजाला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांवर प्रकाशझोत टाकताना दिसत आहेत. असाच एक प्रश्न म्हणजे पाणी टंचाई…हाच विषय मध्यवर्ती ठेवून विक्टरी फिल्म्स ‘युथ’ हा सिनेमा घेऊन येत आहे. ज्या चित्रपटात तरूणाईने मनात आणले तर बदल घडू शकतो असा आशय मांडण्यात आला आहे.
विशाल चव्हाण आणि युग यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली असून राकेश कुडाळकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नेहा महाजन, अक्षय वाघमारे, अक्षय म्हात्रे, मीरा जोशी, शशांक जाधव, केतकी नारायण, या यंग ब्रिगेडबरोबर विक्रम गोखले आणि सतिश पुळेकर हे अनुभवी कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. तर असा बदल घडवण्याची ताकद तरूणाईत निर्माण करणारा युथ येत्या 20 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2016 रोजी प्रकाशित
‘जे होते मला, होते का तुला?’…विचारतो आहे अरमान
माझा जन्म मुंबईत झाला आहे, मी या मायभूमीचे देणं लागतो.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 07-05-2016 at 12:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Armaan malik song in youth movie