‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अनोखं कथानक असलेल्या या चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा हटके झालं होतं. सोशल मीडियावर ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हे नाव चांगलंच चर्चेत होतं. या चित्रपटाच्या टीमने पडद्यामागे घडलेल्या काही मजेशीर गोष्टी ‘न्यूज बुलेटिन’ स्वरुपात सांगितल्या आहेत.
पाहा व्हिडीओ –
अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटाचं दिग्दर्शन आलोक राजवाडेनं केलं आहे. यामध्ये अभय महाजन, पर्ण पेठे, सायली फाटक, अक्षय टंकसाळे, सई ताम्हणकर, अमेय वाघ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.