मराठी विनोदी चित्रपटांचे बादशहा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ बऱ्याच कालावधीनंतर ‘खरं सांगू खोटं खोटं’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ यांच्यासह सयाजी शिंदे आणि निर्मिती सावंत असा तीन गुणी कलावंतांचा योग प्रथमच जुळून आला आहे. शुक्रवार, २० डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
विनोदी चित्रपटांबरोबरच ‘अनपेक्षित’ या गाजलेल्या रहस्यमय मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक संजीव नाईक यांनी ‘खरं सांगू खोटं खोटं’ या विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘गंगूबाई’ अर्थात निर्मिती सावंत यांनी नानी सरंजामे ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
सर्जेराव पाटील या भूमिकेत अशोक सराफ, तर धांदले पाटील या भूमिकेत सयाजी शिंदे झळकणार आहेत. आपल्या अनेकविध विनोदी भूमिकांनी रसिक प्रेक्षकांना दिलखुलास हसायला लावणारे हे तिन्ही कलावंत या विनोदी चित्रपटात धमाल करणार आहेत. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अनलेश देसाई आणि त्रिशला ही नवीन नायक-नायिकेची जोडी या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे. श्रीरंग आरस यांचे संगीत असलेल्या या चित्रपटात हेमांगी वेलणकर, दीपज्योती नाईक यांच्याही भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2013 रोजी प्रकाशित
‘खरं सांगू खोटं खोटं’द्वारे अशोक सराफ, निर्मिती सावंत, सयाजी शिंदे प्रथमच एकत्र
मराठी विनोदी चित्रपटांचे बादशहा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ बऱ्याच कालावधीनंतर ‘खरं सांगू खोटं खोटं’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

First published on: 17-12-2013 at 06:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf nirmiti sawant sayaji shinde first time together working in film khar sangu khot sangu