scorecardresearch

Premium

VIDEO : “भगवान हूँ मैं”, ‘आश्रम ४’मध्ये नवा ट्विस्ट, उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

अभिनेता बॉबी देओलच्या ‘आश्रम ४’ वेबसीरिजचा उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Ashram 4 teaser, Esha Gupta,Prakash Jha,
अभिनेता बॉबी देओलच्या 'आश्रम ४' वेबसीरिजचा उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता बॉबी देओलची मुख्य भूमिका असणारी वेबसीरिज ‘आश्रम ३’ अखेरीस प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या क्राईम थ्रीलर वेबसीरिजमध्ये बॉबी देओल साकारत असलेल्या बाबा निरालाची भूमिका तर प्रचंड गाजत आहे. शुक्रवारी म्हणजे ३ जून रोजी ‘आश्रम ३’ वेबसीरिज एम एक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली. आता या सीरिजच्या चौथ्या भागाची देखील घोषणा करण्यात आली आहे.

बॉबी देओलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘आश्रम ४’चा टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर वेबसीरिजच्या चौथ्या भागाची उत्सुकता वाढवणारा आहे. या एका मिनिटाच्या टीझरची सुरुवात बाबा निरालाच्या दमदार संवादाने होते. तसेच बाबा निराला आश्रममध्ये प्रवेश करताच ‘बाबा निराला की जय’ म्हणताना त्याचे भक्त दिसत आहेत.

ashwariya
“ऐश्वर्या रायबरोबरच्या ब्रेकअपनंतर सलमानची झाली होती ‘अशी’ अवस्था; ‘तेरे नाम’ फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…
salman-khan-tiger-3-trailer-date-out
Tiger 3 Trailer Update: काऊंटडाउन सुरू; ‘या’ दिवशी येणार सलमान खानच्या बहुचर्चित ‘टायगर ३’चा ट्रेलर
Chandramukhi 2 leaked online
Chandramukhi 2: कंगना रणौतला मोठा झटका; ‘चंद्रमुखी २’ प्रदर्शित होताच झाला लीक, कमाईवर होणार परिणाम?
Salman Khan and Katrina Kaif-starrer Tiger 3 teaser
‘जवान’नंतर आता ‘टायगर ३’चा जलवा; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार दमदार टीझर?

आणखी वाचा – जबरदस्त प्रमोशन, देवदर्शन करुनही ‘सम्राट पृथ्वीराज’ला थंड प्रतिसाद, अक्षय कुमारच्या हाती निराशा

या टीझरमध्ये पम्मी पहलवान म्हणजेच अभिनेत्री आदिती पोहनकर देखील दिसत आहे. आदितीच्या भूमिकेमुळे या टीझरची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे, आदितीने या सीरिजच्या आधीच्या भागांमध्ये देखील कमालीचं काम केलं होतं. ‘आश्रम ४’ टीझरमधील संवाद देखील विशेष लक्षवेधी आहेत. “बाबा अंतर्यामी हैं. आपकी मन की बात जानते है.” असं बॉबीने ‘आश्रम ४’चा टीझर शेअर करताना म्हटलं आहे.

आणखी वाचा – Photos : ‘पृथ्वीराज’च्या यशासाठी अक्षय कुमार करतोय देवदर्शन, गंगा आरतीदरम्यानचे फोटो व्हायरल

या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने आपापल्या वाट्याला आलेली भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. अभिनेत्री ईशा गुप्ताने देखील ‘आश्रम ३’मध्ये कमालीचं काम केलं आहे. बॉबी बऱ्याच काळापासून चंदेरी दुनियेपासून दूर होता. त्याच्याकडे फारसे चित्रपट किंवा इतर कोणतेच प्रोजेक्ट नव्हते. पण ‘आश्रम’ मधून कलाकार म्हणून आपण उत्तम आहोतच हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ashram 4 teaser bobby deol prakash jha announce 4 season with new story watch video kmd

First published on: 04-06-2022 at 12:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×