गायक म्हणून स्वत:चं स्थान निर्माण केल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त महेश काळे म्हणतोय, ‘आता थांबायचं नाही!’ ‘स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. या मालिकेद्वारे महेशचा संगीतकार म्हणून ‘स्टार प्रवाह’बरोबर नवा प्रवास सुरू होत आहे.
‘स्टार प्रवाह’ची’नकुशी.. तरीही हवीहवीशी’ ही अतिशय वेगळ्या विषयावरची मालिका असून ती नक्कीच लक्ष वेधून घेणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून महेशनं प्रथमच संगीत दिग्दर्शन केलं आहे. एक वेगळा प्रयोग करत असल्याचं महेशनं सोशल मीडियात जाहीर केलं होतं. त्यामुळे महेशच्या चाहत्यांमध्ये या गाण्याविषयी मोठी उत्सुकता होती. मालिकेच्या टायटल साँगचा टीजर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आल्यावर महेशच्या या नव्या प्रयत्नाचं सोशल मीडियातून भरभरून स्वागत झालं आहे.
गीतकार समीर सामंतनं नकुशीचं टायटल साँग लिहिलं आहे. तर, बेला शेंडेनं गाणं गायलं आहे. महेशनं संगीतबद्ध केलेलं टायटल साँग ‘नकुशी’चं वैशिष्ट्य ठरणार आहे.
आपल्या गायकीने अल्पावधीतच रसिकांचे मन जिंकलेल्या @maheshmkale चा हा मेसेज खास तुमच्यासाठी. pic.twitter.com/rHDdKNIsbo
— Star Pravah (@StarPravah) September 16, 2016
सादर करतोय #Nakushi चं आयुष्य रेखाटणारं @maheshmkale च्या आवाजातलं हे गाणं. Click to listen https://t.co/YmPYCap87p pic.twitter.com/B7hg2pq8GF
— Star Pravah (@StarPravah) September 16, 2016