अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असलेली बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि साहिल संघ या जोडीचा लग्नसोहळा शनिवारी रात्री नवी दिल्ली येथे पार पडला. नवदाम्पत्याला पुढील वाटचालीसाठी बिपाशा बसू, लारा दत्ता, जनेलिया देशमुखांसह अनेक बॉलिवूड सेलेब्रिटिंनी शुभेच्छा दिल्या. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने गॉड ब्लेस यू म्हणत टि्वटवर शुभसंदेश पोस्ट केला. दिया मिर्झाबरोबर मॉडेलिंगची कारकीर्द सुरू करणारी बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता पती महेश भूपतीसह लग्नसोहळ्यास उपस्थित होती. लारानेदेखील टि्वटरवरून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठीच्या शुभेच्छा दिल्या. तुमची जोडी खूप सुंदर दिसत असून, तुम्हाला जीवनभर आनंद लाभो, अशी भावना सोहाने टि्वटरवर व्यक्त केली. याशिवाय जनेलिया देशमुख आणि हुमा कुरेशीसह अनेक बॉलिवूड सेलेब्रिटिंनी दिया मिर्झा आणि साहिल संघ या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: B town congratulates newlyweds dia mirza sahil sangha
First published on: 19-10-2014 at 07:42 IST