‘आजा मेरी गाडी में बैठ जा’, ‘टन टना टन हो गया’ आणि अन्य काही गाणी गाऊन बाबा सेहगल याला लोकप्रियता मिळाली. ‘पॉप सिंगर’, अभिनेता, संगीतकार अशी ओळख असलेला बाबा सेहगल आता ‘पकडम पकडाई’ म्हणत खास छोटय़ा मुलांसाठी गाणे गायला आहे. सोनिक वाहिनीवर ‘पकडम पकडाई’ ही मालिका दाखविण्यात येते.
बाबा सेहगल याने गायलेल्या ‘गोईंग टु द जीम’, ‘चिकन फ्राइड राइस’ ही गाणी ही इंटरनेटवर लोकप्रिय असून सेहगलचे हे नवे गाणे नुकतेच प्रकाशित झाले आहे. ‘पकडम पकडाई’ ही अॅनिमेटेड मालिका असून यात ‘डॉगी डॉन’ हा कुत्रा, त्याचा मोठा भाऊ कर्नल आणि मोटू, छोटू व लंबू हे तीन उंदीर अशी पात्रे आहेत. लहान मुलांमध्ये ही पात्रे लोकप्रिय असून या मुलांसाठी हा खास व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. सोनिक वाहिनीवरील या लोकप्रिय मालिकेसाठी या पात्रांना घेऊन ‘पकडम पकडाई’ हा व्हिडीओ तयार करण्यात आला असून लहान मुलांसाठी हे खास रॅप गाणे तयार करण्यात आले आहे.
बाबा सेहगल याच्या चाहत्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून आजवरच्या यशात त्यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे लहान मुलांच्या मालिकेतील पात्रांबरोबर हे विशेष गाणे तयार करण्यात आल्याचे सेहगल याचे म्हणणे आहे.
http://www.sonicgang.com/baba या संकेतस्थळावर हे गाणे पाहता येत असून हा व्हिडीओ मुलांमध्ये लोकप्रिय झाला आहे. गेल्या बारा दिवसांत या व्हिडीओला सुमारे दोन लाख प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2015 रोजी प्रकाशित
बाबा सेहगलची ‘पकडम पकडाई’!
‘आजा मेरी गाडी में बैठ जा’, ‘टन टना टन हो गया’ आणि अन्य काही गाणी गाऊन बाबा सेहगल याला लोकप्रियता मिळाली
Written by रोहित धामणस्कर

First published on: 23-09-2015 at 06:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba sehgal pakdam pakdai