Siddharth Shukla Death: ‘बालिका वधु’मधील जोडीची कायमची एक्झिट; आनंदीची आत्महत्या तर ‘शिव’ला हार्टअटॅक

‘बालिका वधू’मधल्या आनंदीनंतर आता ‘शिव’ने घेतलेली अकाली एक्झिट काळजाला चटका लावणारी ठरली आहे. प्रत्यूषाच्या निधनाला पाचच वर्षे पूर्ण झाली नाहीत तर सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं.

sidharth shukla, pratyusha banerjee,
अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी आणि सिद्धार्थ शुक्ला या दोघांमध्ये मालिकेदरम्यान घट्ट मैत्री झाली होती.

‘बालिका वधू’ या मालिकेतून अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या लोकप्रिय टीव्ही मालिका ‘बालिका वधू’ मधल्या शिव-आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. ही मालिका जितकी प्रसिद्ध झाली तितकेच या मालिकेत भूमिका साकारणारे कलाकारही प्रसिद्ध झाले. या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला ‘शिव’ म्हणजेच अभिनेता सुद्धार्थ शुक्लाचं आज निधन झालं. काही वर्षापूर्वी याच मालिकेतील ‘आनंदी’ म्हणजेच अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या चाहत्यांच्या मनाला आज पुन्हा मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांच्या ‘बालिका वधू’च्या जोडींनी घेतलेली अशी अकाली एक्झिट काळजाला चटका लावणारी ठरली आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘बालिका वधू’ या मालिकेत आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी झळकली होती. तिचा पती शिव उर्फ शिवराज शेखरच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला त्याच्या दमदार अभिनयाने शिव-आनंदीच्या जोडीला पूर्ण करत होता. या मालिकेत सिद्धार्थ शुक्लाच्या आकर्षक व्यक्तिमत्व आणि सकारात्मक चारित्र्यामुळे घरोघरांत त्याचे लाखो फॅन्स तयार झाले होते. या मालिकेतील सिद्धार्थ शुक्लाची शिवराज शेखरची भूमिका लोकांच्या मनात इतकी घट्ट बसली आणि सिद्धार्थ शुक्ला रातोरात्र एक स्टार बनला. टीव्ही स्क्रीनवर शिव-आनंदीची जोडी प्रेक्षकांच्या घरातील एका जोडीप्रमाणेच मानत असत. परंतू या जोडीने घेतलेल्या अशा अकाली एक्झिटने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

आणखी वाचा : अधिकाऱ्यावर कारवाईचे कारण KBC नाही तर, रेल्वेने दिली भलीमोठी यादी

या मालिकेतील आनंदीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणाऱ्या प्रत्यूषा बॅनर्जीने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. १ एप्रिल २०१६ रोजी तिने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. शिव-आनंदी या जोडीचे फॅन्स प्रत्यूषाच्या निधनाच्या धक्क्यातून आता कुठे बाहेर पडत होते, इतक्यात ‘शिव’ने ही जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली. प्रत्यूषाच्या निधनाला पाचच वर्षे पूर्ण झाली नाहीत तर अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं देखील वयाच्या ४० व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

आणखी वाचा : वयाच्या ४०व्या वर्षी निधन झालेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे तरी कोण?

अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी आणि सिद्धार्थ शुक्ला या दोघांमध्ये मालिकेदरम्यान घट्ट मैत्री झाली होती. प्रत्यूषाच्या आत्मत्येनंतर सिद्धार्थ शुक्लाला देखील मोठा धक्का बसला होता. तिच्या वाढदिवशी तो दरवर्षी एक पोस्ट शेअर करत तिच्या आठवणींना उजाळा देत असत. त्यामूळे ‘शिव-आनंदी’च्या जोडीची ही एक्झिट प्रेक्षक कधीस विसरू शकणार नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Balika vadhu lead actors sidharth shukla pratyusha banerjee shocking death prp