प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चेत आहे. रेणुका शहाणे यांनी नुकतंच झी मराठीवरील नव्या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यांचा ‘बँड बाजा वरात’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा कार्यक्रम अगदी वेगळ्या स्वरूपाचा आहे. भावी वधू-वर आणि त्यांचं कुटुंब हे या कार्यक्रमात सहभागी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सध्या या कार्यक्रमाची सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळत आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी त्यांचं लग्न आणि आहेर या संबंधित एक किस्सा शेअर केला. अलिकडेच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे यांना ‘लग्नात अशी कोणती वस्तू आहेर म्हणून मिळाली होती. जी त्यांनी आजवर जपून ठेवली आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी त्यांच्या लग्नाचा खास किस्सा शेअर केला.

आणखी वाचा- राणी- अभिषेकच्या ब्रेकअपचं कारण ठरला बिग बींसोबतचा ‘तो’ किसिंग सीन? वाचा नेमकं काय घडलं

रेणुका शहाणे म्हणाल्या, ‘आमचं लग्न इतरांसारखं झालं नव्हतं. आम्ही मंदिरात लग्न केलं, त्यामुळे त्या लग्नात खूप लोकं आम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होती, पण आम्ही आहेर स्वीकारला नव्हता. माझ्या सासरकडून माझे मोठे दीर यांनी माझ्या स्वागतासाठी एक पत्र लिहिलं होतं, त्यांनी दिलेलं ते पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. ते पत्र माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेर आहे असं मी म्हणेन.’

आणखी वाचा- The Kashmir Files वर अखेर आमिर खाननं सोडलं मौन, म्हणाला “जेव्हा एका व्यक्तीवर अत्याचार…”

दरम्यान खूप वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर रेणुका शहाणेंना पाहताना प्रेक्षक उत्साही असल्याचं दिसून येतंय. रेणुका शहाणे यांचा हा कार्यक्रम १८ मार्चपासून झी मराठी वाहिनीवर सुरू झाला आहे. या कार्यक्रमत रेणुका शहाणे यांच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर देखील दिसत आहे. रेणुका शहाणे या कार्यक्रमात सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसत आहेत.