भारतीय चित्रपट निर्माते अमजद खान यांच्या आगामी चित्रपटात एक बांगलादेशी मुलगी मलालाची भूमिका साकारणार आहे. मलालाने पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवला होता. ढाका येथे राहणारी १६ वर्षीय फातिमा शेख मलालाच्या भूमिकेत दिसणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवणा-या १५ वर्षीय मलालावर गतवर्षी तालिबानी आतिरेक्यांकडून गोळीबार करण्यात आला होता, त्यानंतर लंडनमध्ये तिच्यावर बराच काळापर्यंत उपचार सुरू होते. सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपटात मलालाची भूमिका साकारणा-या फातिमाविषयी संबंधितांकडून विस्तृत माहिती जाहीर करण्यात आली नसून, चित्रिकरण सुरू झाल्यावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात येत आहे. कोलकाता शहराशी नाते असलेले खान म्हणाले, विद्यार्थिनी असलेली फातिमा मलालासारखी दिसते. चित्रपटाचे चित्रिकरण लंडन, पाकिस्तान, इराण आणि भारतात केले जाणार आहे. इंग्रजी भाषेत निर्माण होणा-या या चित्रपटाचे नाव 'गुल मकाई' असे आहे. बीबीसी वृत्तवाहिनीने मलालासाठी या शब्दांचा वापर केला होता.