मनोरंजन…. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीशी उसंत मिळाल्यावर अनेकांचं मन रुळवणारा एक घटक. मनोरंजनाच्या विविध साधनांना आणि माध्यमांना प्रत्येकाची पसंती असते. त्यातीलच एक माध्यम म्हणजे चित्रपट. बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंतच्या जवळपास अनेक चित्रपटांचे लाखो-करोडो रसिक स्वत:ला कट्टर चित्रपटप्रेमी म्हणवतात. अनेकजण तर त्यांचा हा स्वघोषित कट्टरपणा सिद्धही करतात. चित्रपटाच्या संवादांपासून ते अगदी लहानातल्या लहान व्यक्तिरेखेपर्यंतची माहिती ठेवणाऱ्या या चाहत्यांचे कधीकधी कलाकारांनाही कुतुहल वाटते. तुम्हालाही जर स्वत:ला चित्रपटांबद्दल विलक्षण प्रेम वाटत असेल, तर चला, सिने नॉलेजच्या या गुंतागुंतीच्या एका प्रश्नाचं उत्तर देत सिद्ध करा तुमचं रसिकत्व..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ बच्चन आणि अमृता सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मर्द’ चित्रपट १९८५ साली प्रदर्शित झाला होता. मनमोहन देसाई दिग्दर्शित हा चित्रपट नंतर तमिळमध्ये ‘माविरन’ या नावाने बनविण्यात आला होता. ‘मर्द’ या चित्रपटाला संगीतकार अनू मलिक याने संगीत दिले होते. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण उटी येथे झाले होते. तसेच, याचा काही भाग कर्नाटक, मैसूर आणि बंगळुरु पॅलेस येथेही चित्रीत करण्यात आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before amrita singh which two actresses were offered mard movie
First published on: 23-01-2017 at 08:35 IST