राजकुमार राव आणि श्रुती हसन यांचा आगामी बहन होगी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपावरून सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना गुरुवारी अटक करण्यात आली होती. पण त्यांची आता जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिग्दर्शक अजय कुमार पन्नालाल आणि निर्माता टोनी डिसुझा या दोघांना जालंधर पोलिसांनी मुंबईत येऊन दोघांना ताब्यात घेतले होते.
‘बहन होगी तेरी’ या सिनेमाटातील एका पोस्टरमुळे त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. ४ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या एका पोस्टरमध्ये अभिनेता राजकुमारने महादेवाची वेशभूषा केली होती. ही वेशभूषा करून उत्तर प्रदेशाची नंबर प्लेट असलेल्या एका मोटरसायकलवर तो बसल्याचे दाखविण्यात आले होते. या पोस्टरमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची तक्रार जालंधर येथील एका गटाने केली होती.
आमिर, सलमानला जे जमले नाही ते ‘बाहुबली’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ने करुन दाखवले
‘बहन होगी तेरी’ या सिनेमात राजकुमारने गट्टू नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. बहुरूप्याचे काम करणारा गट्टू भगवान शिवाची भूमिका साकारत असतो. सिनेमात राजकुमार राव, श्रुती हसन यांच्याशिवाय गौतम गुलाटी, गुलशन ग्रोवर आणि रंजित यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यापूर्वी सिनेमाच्या प्रदर्शन तारखेमुळे चर्चेत आला होता. २ जूनला प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाची तारीख ९ जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. या सिनेमातून राजकुमार आणि श्रुती यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे.