एकेकाळी भारतातील सर्वात आकर्षक पुरुष म्हणून निवड झालेला अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या ‘डिशूम’ या चित्रपटाच्या निमित्ताने सतत प्रसारमाध्यमांसमोर येत आहे. अशाच एका कार्यक्रमात आलेल्या जॉनने आकर्षणाची एक वेगळीच परिभाषा मांडत एक नवा दृष्टिकोन दिला. ‘सौंदर्य म्हणजेच आकर्षण नव्हे’ असे विधान करत ‘फक्त सुंदरतेवरच आकर्षणाचे निकष अवलंबून नसून तुम्ही आयुष्य कसे जगता, आयुष्यात किती आणि कोणती चांगली कामे करता यावरुनही तुम्ही किती आकर्षक आहात हे ठरु शकते’ असेही जॉन म्हणाला. ‘डिशूम’ मधील भूमिकेबद्दल सांगताना ‘मी साकारत असलेले कबीर हे पात्र मला फार जवळचे वाटते’ असे म्हणत त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली. ‘अॅक्शनपटात’ जास्त प्रमाणात झळकणाऱ्या जॉन अब्राहमने ‘अॅक्शन’ आणि विनोदी चित्रपटांकडचा आपला ओढा जास्त आहे असेही सांगितले. ‘डिशूम’ या चित्रपटातून जॉनच्या रुपातली ‘अॅक्शन’ आणि वरुण धवनच्या रुपातली ‘कॉमेडी’ सिनेरसिकांना पाहायला मिळणार आहे. २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, जॉन अब्राहम, वरुण धवन अशी तगडी ‘स्टारकास्ट’ झळकणार आहे. एका मोठ्या विरामानंतर पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणाऱ्या जॉनसाठी त्याच्या ‘फिमेल फॅन्समध्ये’ बरीच उत्सुकता दिसत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2016 रोजी प्रकाशित
जॉनने सांगितली आकर्षणाची परिभाषा…
जॉनच्या पुनरागमनाबद्दल त्याच्या 'फिमेल फॅन्समध्ये' बरीच उत्सुकता दिसत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-07-2016 at 16:45 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Being sexy is not just about looks says john abraham