बंगाली अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जीने फूड डिलिव्हरी अॅप स्विगी त्याची दिवाळी ऑर्डर देऊ शकला नाही म्हणून शनिवारी चक्क पंतप्रधान नरेंद्र मादी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तक्रार केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रोसेनजीतने ही तक्रार केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि प्रोसेनजीतला ट्रोलिंगचा सामना करावा लागला असेल.
प्रोसेनजीतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट करत ही तक्रार केली आहे. ३ नोव्हेंबर रोजी, मी फूड डिलिव्हरी अॅप स्विगीवर एक ऑर्डर दिली. थोड्या वेळानंतर ऑर्डर डिल्वह होत असल्याचं दिसलं परंतु माझ्यापर्यंत ऑर्डर पोहोचली नाही. स्विगीकडे ही तक्रार दाखल केली. मी ऑर्डरचे पैसे आधीच दिले होते म्हणून त्यांनी मला पैसे परत केले,” असे प्रोसेनजीत म्हणाला.
पुढे प्रोसेनजीत म्हणाला, ही पोस्ट शेअर करत मला तुमचे लक्ष वेधून घ्यायचे होते कारण मला वाटतं की कोणीही या समस्येचा सामना करू शकतो. जर कोणी त्यांच्या पाहुण्यांसाठी फूड डिलिव्हरी अॅपवरून काही ऑर्डर केलं आणि जेवण आलंच नाही तर काय? जर कोणी पूर्णपणे फूड अॅप्सवर अवलंबून असेल तर काय होईल? ते उपाशी राहतील का? अशा अनेक गोष्टी घडू शकतात. त्यामुळे या विषयी बोलण्याची आवश्यकता असल्याचे मला वाटते.
आणखी वाचा : “लोकांनी शाहरुखचे चित्रपट का पाहावे?” किंग खानला सल्ला देत महेश मांजरेकर म्हणाले…
प्रोसोनजीतची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “पंतप्रधान आणि बंगालचे मुख्यमंत्री यावर एकमेकांशी सहमत होऊ शकतात आणि हे प्रकरण सीबीआयकडे पाठवू शकतात हा प्रोसेनजीतचा आत्मविश्वास मला आवडतो! यासाठी निश्चितपणे सीबीआय तपासाची आवश्यकता आहे आणि कदाचित MEA आणि संरक्षण मंत्रालयाला एकत्र येऊन हा रिपोर्ट देण्याची आवश्यकता असेल.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तू मस्करी करतोयस ना…” तिसरा नेटकरी म्हणाला, “सर, कृपया UN आणि जो बायडेन यांना सुद्धा टॅग करा”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.