मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या ‘भिरकीट’ नावाचे हास्याचे वादळ येत आहे. ‘भिरकीट’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हे वादळ १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा संगीत सोहळा पार पडला. चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस आल्यानंतर आता चित्रपटाचीउत्सुकता वाढवणारा ट्रेलरही भेटीला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेलरमध्ये आपल्याला तात्या पाहायला मिळत आहे, ज्यांची सगळ्यांच्या मदतीसाठीची धडपड दिसत आहे. त्यात असे काही घडल्याचे दिसतेय की, त्यातून अवघ्या गावाची दृष्टी बदलते. आता अशी कोणती घटना घडते, ज्यातून हा बदल घडतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हसवता हसवता मनाला स्पर्शून जाणारा हा चित्रपट आहे.

आणखी वाचा- ‘मस्जिद है या शिवाला…’ ज्ञानवापी मशीद वादानंतर मनोज मुंतशीर यांची कविता व्हायरल

चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात,” ‘भिरकीट’ ही गावच्या मातीची कथा आहे. राजकारण, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी , विनोद हे संपूर्ण रस या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गाणी तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसाच चित्रपटाला देखील असाच भरभरून प्रेक्षक प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे. ‘भिरकीट’चा ट्रेलर आज प्रदर्शित होत आहे.संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे.

आणखी वाचा- मुलगी मालतीबद्दल निक जोनसला काय वाटतं? चॅट शोमध्ये केला खुलासा

या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर, अश्विनी बागल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.या चित्रपटाचे ,छायाचित्रण मीर आणि संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhirkit official trailer release anup jagdale girish kulkarni moalisa bagal mrj
First published on: 27-05-2022 at 10:31 IST