“दिवाळीचा फटाका अचानक फुटला…”, अभिनेत्रीचा अपघात होता होता वाचला

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

rani chatterjee, diwali video,
अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सध्या संपूर्ण भारतात दिवाळी हा सण साजरा केला जात आहे. काल म्हणजेच गुरुवारी सगळ्यांनी मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली. दरम्यान, यातच भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवाळीत फटाके फोडताना अपघात होता होता रानी वाचली आहे. रानीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रानीने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रानीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर रानी तिच्या घराबाहेर फुलबाजाने पाऊस पेटवताना दिसत आहे. तेवढ्यात पाऊस फुटतो. हा व्हिडीओ शेअर करत “काल हे झालं मी आणि सौम्या तर वाचलो, पण मित्रांनो तुम्ही सावध राहा”, अशा आशयाचे कॅप्शन रानीने दिले आहे.

आणखी वाचा : “पहिल्याच डेटवर बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…”, ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विष

रानी ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतली सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. रानी या आधी ‘बिग बॉस’ या शोमध्ये ही आली आहे. रानी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. रानी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhojpuri actress rani chatterjee survived an accident with firecrackers on diwali video goes viral on social media dcp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या