Bigg Boss 16: सुंबूल तौकीर खान बिग बॉसमधील सर्वात लहान स्पर्धक आहे. सुंबूलने बिग बॉसमध्ये प्रवेश केला तेव्हा सर्वांची तिच्यावर नजर होती. सुंबूल बिग बॉसच्या विजेतेपदाची दावेदार मानली जात होती. पण याउलट सुंबूल सर्वात दुबळी स्पर्धक ठरत आहे. सुंबूल कार्यक्रमात फक्त शालीनसोबत दिसते. दोघांमधील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय आहे. यामुळे सोशल मीडियावरही तिला ट्रोल केलं जात आहे. त्यातच आता सुंबूलच्या वडिलांनी मोठं विधान केलं आहे.

बिग बॉसमध्ये सुंबूलला का पाठवलं होतं?

सुंबूलच्या वडिलांनी ‘आजतक’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार “मी माझ्या १८ वर्षांच्या मुलीला काहीतरी शिकण्याच्या उद्देशाने बिग बॉसमध्ये पाठवलं होतं. माझ्या मुलीने आयुष्यात कधीच नकारात्मकपणा पाहिलेला नाही. ती नेहमी माझ्या सावलीत राहिली आहे. बिग बॉसमध्ये जाऊन तिने लोकांना समजून घ्यावं, जग किती निष्ठूर आहे हे तिला कळावं अशी माझी अपेक्षा होती”.

“मला अपूर्वा नेमळेकरचं तोंडही बघायचं नाही” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेली यशश्री स्पष्टच बोलली

“बिग बॉसमध्ये चार महिन्यात तिला जी शिकवण मिळेल, ती कदाचित ४० वर्षात मिळाली नसती. पण तिथे गेल्यावर माझ्या मुलीचं चारित्र्यहनन होईल याची मला कल्पना नव्हती. माझ्या मुलीचा नॅशनल टीव्हीवर ज्याप्रकारे तमाशा करण्यात आला आहे, ते पाहून मला यातना होत आहेत,” अशी खंत त्यांनी मांडली आहे.

बिग बॉसमध्ये मुलीला पाठवल्याचा पश्चाताप?

पुढे ते म्हणाले की “याचमुळे मला प्रचंड वेदना होत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा, मी १८ वर्षात कधीही माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही. मी तिला कधी ओरडलेलोही नाही. पण तिथे ती रोज रडत आहे. हे पाहून माझ्या मनाला वेदना होत आहेत. मी तिच्या चाहत्यांना विनंती करतो की, जर त्याचं खऱंच माझ्या मुलीवर प्रेम असेल तर तिला मत देऊ नका. लवकरात लवकर तिला तिथून बाहेर पडू देत. मी एका ट्रॉफी आणि खेळासाठी मुलीचा बळी देऊ शकत नाही”.

“आताही त्यांचं नातं….”; शिव ठाकरे-वीणा जगतापच्या रिलेशनबद्दल मराठी बिग बॉस विजेतीचा गौप्यस्फोट

“मी आपल्या मुलीला गमावू इच्छित नाही. ज्याप्रकारे ती आतमध्ये गेली, तसंच तिने बाहेर यावं. मला पुन्हा एकदा हसणारी, खेळणारी सुंबूल पाहायची आहे. तिथे गेल्यानंतर ती आपलं अस्तित्व विसरली आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी साजिद खानचं म्हणणं ऐकायला हवं होतं. साजीदने तिला सांगितलं होतं की, ती फक्त १८ वर्षांची आहे, तिने कॉलेजला गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे. मला ते आधी भेटायला हवे होते. मला आता मी एक अपयशी बाप वाटू लागलो आहे. बिग बॉसमध्ये पाठवून मी फार मोठी चूक केली आहे,” अशी कबुली त्यांनी दिली आहे.