बॅंड बाजा बारात! राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या संगीताची जोरदार तयारी बघा…..

राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्नाची जय्यत तयारी.

rahul-vaidya-disha-parma-wedding-photo
Photo- viral bhayani Instagram account

‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंण्ड दिशा परमार हे सध्या बरेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल आणि दिशा लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. एवढचं नव्हे तर स्वत: राहुलने ते लवकरच लग्न करणार आहे अशी माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. अखेर तो क्षण आता जवळ आला आहे. राहुल आणि दिशा लवकरच लग्न बंधनात बांधले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल आणि दिशाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली होती. जुलै महिन्यातच दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत असे त्या पत्रिकेद्वारा त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले होते.

शुक्रवार, 16 जुलै रोजी राहुल आणि दिशा लग्न करणार असून ते आता त्यांच्या लग्ना पूर्वीच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. राहुल आणि दिशाच्या संगीत रिहर्सलचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात ते संगीत सेरेमनीची जोरदार तयारी करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by DP (@dishaparmar)

या आधी दिशा आणि राहुलला लग्नाची शॉपिंग करताना स्पॉट करण्यात आले होते आणि आता त्यांच्या संगीत सेरेमनीच्या रिहर्सलची पहिली झलक समोर आली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भय्यानी’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिशा आणि राहुल हे त्यांच्या संगीत सोहळ्याची जय्यत तयारी करताना दिसत आहेत. हे कपल आणि सोलो असे दोन परफॉर्मन्स करणार असल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे. राहुल आणि दिशाच्या या कपल परफॉर्मन्सकडे पाहून त्यात त्यांच्या प्रेमाची झलक पहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कोर‍ियोग्राफर ‘सुमित खेतान’ यांनी त्यांचा डान्सची कोर‍ियोग्राफी केली आहे. तसंच या सोहळ्यात राहुल वैद्यचा खास मित्र म्हणजे आली गोनी आणि त्याची गर्लफ्रेंण्ड जास्मिन भसीन देखील डान्स करणार आहेत.

View this post on Instagram

 

A post shared by RAHUL VAIDYA RKV

दरम्यान राहुलने शेअर केलेल्या पत्रिकेत त्यांनी लिहले की, ”आमच्या  कुटुंबियांच्या आशिर्वादाने तुमच्या सोबत हे क्षण शेअर करण्यात आनंद होत आहे. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होतोय की १६ जुलैला आम्ही लग्नबंधनात अडकत आहोत. आमच्या आयुष्यातील हा प्रेमाचा नवा अध्याय सुरु करताना आम्हाला तुमच्या आशिर्वादांची आणि प्रेमाची गरज आहे.” तसंच कोविड महामारीला लक्षात घेऊन कमी माणसांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न करणार असल्याचे सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big boss fame rahul vaidya and disha parmar is all set to tie knot recently share some glimpse of prewedding rituals aad

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या