‘बिग बॉस मराठी ३’ या शोमध्ये आदिश वैद्यची वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. आदिश घरात येताच घरातील वातावरण बदलंल आहे. काही जण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काहींनी मात्र सुरुवातीपासूनच त्याच्या विरोधात मत तयार केलंय. आदिशने देखील घरात एण्ट्री करताच सगळ्यांना टशन दिली आहे. नुकत्याच झालेल्या एका भागात आदिश आणि जयमध्ये वाद रंगलेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता आदिश आणि सुरेखा कुडची यांच्यात कडाक्याचं भांडण पाहायला मिळणार आहे.
कलर्स मराठीने या शोचा नवा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज केलाय. यात आदिश आणि सुरेखा कुडची यांच्यात वाद झाल्याचं दिसून येतंय. येत्या भागात कॉलेज कल्ला या टास्कमध्ये सुरेखा कुडची, मीरा जगन्नाथ, सोनाली पाटील हे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायला घेणार आहेत. उत्कर्ष, दादूस, आदिश आणि सोनाली यांच्या क्लासनंतर सुरेखा कुडची देखील प्राध्यापक म्हणून क्लास घ्यायला येणार आहेत. क्लासमध्ये आल्यानंतर त्यांनी स्नेहा वाघचे कौतुक केले, विशाल निकमशी गंमतीशीर संवाद साधला. पण काही वेळानंतर मात्र घराचे वातावरण थोडे बदलताना दिसणार आहे.
‘तारक मेहता…’मधील टप्पूने सोनूच्या फोटोवर केली ‘ही’ कमेंट, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
सुरेखा कुडची यांचा क्लास सुरू असताना आदिश वैद्य त्यांना , “चला चला कार्य सुरू ठेवा” असं म्हणत असल्याचं प्रोमोत दिसतंय. त्यावर सुरेखाताई म्हणाल्या, “प्रोफेसर आदिश वैद्य यांना विनंती करते की प्लीझ तोंड बंद ठेवा…… कारण तुमची जस्ट एंट्री झाली आहे , आम्ही जुने आहोत.” सुरेखा कुडची यांच्या या प्रतिक्रियेमुळे आदिशला राग अनावर झाला. यावर आदिशने देखील सुरेखा कुडची यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे आता हा वाद नेमका कुठवर रंगतो. तो टास्कपर्यंतच मर्यादित राहतो की त्याचा परिणाम पुढेही पाहायला मिळेल हे तर येत्या भागातच कळेल