‘बिग बॉस मराठी ३’मध्ये दुसरा आठवडा सुरु झाला असून बिग बॉसने सदस्यांनावर “हल्लाबोल” हे कार्य सोपावलं आहे. या टास्कच्या पहिल्या दिवशीच सुरेखा कुडची आणि सोनालीला दुसऱ्या टीममधील सदस्यांकडून मोटार बाईकवरून उतरवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करण्यात आला. अखेर सुरुखा कुडची यांनी माघार घेतली.

त्यानंतर आजच्या भागात विशाल आणि विकाल मोटार बाईकवर बसणार असून या टास्कमध्ये ते किती टिकून राहतात हे पाहायला मिळणार आहे. दरम्यान या टास्कमध्ये स्नेहा वाघ आणि तिचा पुर्वाश्रमीचा पती अविष्कार यांच्या वादाची ठिकणी पडल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हल्लाबोल टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी विरुध्द टीमचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत. आविष्कार विकास आणि विशालला धीर देताना दिसणार आहे, “मी रेडी आहे खेळायला, पण आता तुम्हाला खेळायचे आहे.” असं म्हणत अविष्कार दोघांना सपोर्ट करतोय. मात्र यावर स्नेहाने अविष्कारवर निशाणा साधलाय. ““जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार”? असं म्हणत स्नेहाने अविष्कारला चिमटा काढलाय. त्यामुळे यावरून दोघांमध्ये वाद होणार का हे आजच्या भागात कळेलच.

देसी गर्लचा देसी अंदाज व्हायरल; प्रायव्हेट जेटमध्ये चक्क मांडी घालून बसली प्रियांका चोप्रा

 “तुझे गाल माकडासारखे…”; व्हायरल फोटोंमुळे दिव्या खोसला कुमार ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात आल्यापासूनच स्नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्नेहाचा पहिला पती अविष्कार दारव्हेकरदेखील या शोमध्ये सहभागी झाल्याने दोघांमध्ये येत्या काळात काय घडतयं याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. स्नेहाने १९व्या वर्षी अविष्कारसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र काही काळात दोघं विभक्त झाले. छळ आणि हिंसाचार केल्याचा आरोप स्नेहाने अविष्कारवर केला होता. तर स्नेहाचं दुसरं लग्नदेखील केवळ आठ महिनेच टिकलं होतं.