Bigg Boss 12 : ३७ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडमुळे अनुप जलोटा ट्रोल; प्रियांका-निकशी केली तुलना

जसलीन ही अनुप जलोटा यांची शिष्यादेखील आहे. या दोघांमधील वयाच्या फरकावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.

anup jalota
अनुप जलोटा, जसलीन मथारू

टेलिव्हिजनचा सर्वांत वादगस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चं बारावं पर्व नुकतंच सुरू झालं आहे. रविवारी १६ सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात या शोचा पहिला दिवस पार पडला. ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांची एण्ट्री झाली, पण खरा हंगामा तर तेव्हा सुरू झाला जेव्हा ६५ वर्षीय प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांनी जोडीदार जस्लीन मथारू हिच्यासोबत प्रवेश केला. २८ वर्षीय जसलीन ही अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड असून ती त्यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे. हे दोघं गेल्या साडेतीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे ‘बिग बॉस’च्या सेटवर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. सध्या सोशल मीडियावर या जोडीचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वात काहीतरी नवीन पाहायला मिळतं. यंदाच्या पर्वात स्पर्धक जोडीदारासह सहभागी झाले आहेत. आपल्या जोडीने या स्पर्धेत प्रवेश करतानाच अनुप जलोटा आणि जसलीन मथारू या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं. जसलीन ही अनुप जलोटा यांची शिष्यादेखील आहे. या दोघांमधील वयाच्या फरकावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. काहींनी तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा प्रियकर निक जोनासशी या जोडीची तुलना केली आहे. प्रियांका आणि निक यांच्या वयातही दहा वर्षांचा फरक आहे.

अनुप जलोटा आणि जसलीन यांच्यावर बरेच मीम्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनुप जलोटा यांचं यापूर्वी तीन वेळा संसार मोडला असून गायिका सोनाली सेठ हीच्या बरोबर अनुप यांचा पहिला विवाह झाला होता. त्यानंतर त्यांनी बीना भाटिया हिच्यासह लग्न केलं. मात्र त्यांचा हा संसारही काही काळ टिकला आणि ते विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी मेधा गुजराल यांच्याबरोबर लग्न केलं परंतु मेधा यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून अनुप जसलीनला डेट करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bigg boss 12 anup jalota and girlfriend jasleen trolled fans compare them to priyanka chopra and nick jonas

ताज्या बातम्या