छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. यंदाच्या १४ व्या पर्वात छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये दिसत असून कुमकुम भाग्य या मालिकेतील नैना सिंह ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरात आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. वाइल्ड कार्ड एण्ट्री झालेल्या नैना सिंह आणि शार्दुल पंडित यांच्यातील वादामुळे यंदाचं पर्व विशेष गाजत आहे. मात्र, नैना या शोमध्ये सहभागी कशी झाली हे तिने काही दिवसांपूर्वी एक मुलाखतीत सांगितलं आहे.

“मी गेल्या कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम पाहत आहे. मागील पर्वदेखील मी पूर्ण पाहिलं. मला सतत असं वाटायचं की ज्यांचं करिअर संपलं आहे ते पुन्हा प्रकाशझोतात येण्यासाठी हा शो करतात. पण गेल्या पर्वात असे अनेक कलाकारा होते जे प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यातच सध्याची परिस्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठावूक आहे. म्हणूनच मी हा शो करण्याचा निर्णय घेतला. हा शो करण्यासाठी मला फार चांगली संधी मिळाली आहे आणि या लॉकडाउनमध्ये मी घरातली बरीच काम करणंदेखील शिकले आहे”, असं नैना म्हणाली.

आणखी वाचा- ‘या’ व्यक्तीमुळे कविता कौशिक झाली Bigg Boss 14 मध्ये सहभागी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणते, “हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आहे आणि यंदाच्या पर्वात लोक सिनिअर स्पर्धकांमुळे आवर्जुन तो पाहत आहेत. तसंच मला या घरातल्या सगळ्या सदस्यांचा स्वभाव आता माहित झाला आहे. त्यामुळे माझ्या मनावर दडपण किंवा भीतीदेखील नाहीये.” दरम्यान, नेहाने स्पिल्ट्सव्हिला विजेती असून ती करण जोहर आणि रोहित शेट्टीच्या इंडियाज नेक्स्ट सुपरस्टारची फाइनलिस्टदेखील होती.