scorecardresearch

‘बिग बॉस’च्या घरात होणार ‘सुहागरात’; राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत

राखी आणि पती रितेशने ‘बिग बॉस १५’च्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एण्ट्री केली आहे.

‘बिग बॉस’च्या घरात होणार ‘सुहागरात’; राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत
राखी आणि पती रितेशने 'बिग बॉस १५'च्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एण्ट्री केली आहे.

सध्या ‘बिग बॉस १५’ हा छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो चर्चेत आहे. या शोमध्ये आता तीन वाइल्ड कार्ड एण्ट्री झाल्या आहेत. त्यामध्ये रश्मि देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि ड्रामा क्वीन राखी सावंत या अभिनेत्रींचा समावेश आहे. राखी सावंतसोबत तिचा पती रितेश देखील ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखीच्या पतीचा चेहरा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. आता अखेर रितेश राखीसोबत ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखी मेरा पिया घर आया या गाण्यावर डान्स करताना दिसते. तर बाकीचे स्पर्धक हे जीजाजी बोलत रितेशचे स्वागत करताना दिसतात. रितेश येताच इतर स्पर्धक त्याला राखी आणि त्याच्या लव्ह स्टोरी विषयी विचारतात. त्यावर रितेश बोलतो की राखीने त्याला २ वर्षांआधी ब्लॉक केलं होतं.

गेल्या २ वर्षांपासून राखी पती रितेशचा चेहरा पाहण्याची वाट पाहत होती. तर आता रितेशने चक्क ‘बिग बॉस १५’ मध्ये एण्ट्री करत राखी त्यांच्या लग्नाविषयी खोटं बोलत नव्हती हे सिद्ध केलं आहे. त्यांच्या लव्ह स्टोरी काही स्पर्धकांनी विचारले असता रितेश म्हणाला, त्याने एक कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा त्याच्या पीएने त्याला राखीचा नंबर दिला आणि त्याने राखीला फोन केला. त्याने सांगितले की त्याच्या खासगी आयुष्यात काही गोष्टी ठीक सुरु नव्हत्या. मला अशा व्यक्तीशी बोलायचं होतं जो माझ्या फिल्डमधला नाही. मी राखीला हाय मेसेज केला आणि तिने मला ब्लॉक केलं.

आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…

त्यानंतर त्याने तिला दुसऱ्या नंबरवरून तिला मेसेज केला आणि तेव्हा राखीने त्याला रिप्लाय दिला. त्यावर राखी म्हणाली, त्यावेळी मी अस्वस्थ होती. माझा एक बॉयफ्रेंड होता आणि नंतर मला कळलं की तो एक डॉन आहे. त्याच्यावर कर्ज होतं आणि मला जिवाचा धोका वाटतं होता. त्यामुळे मी त्याच्याशी मदत मागत होती आणि मला लग्न करायचं होतं.

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने केला तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा

त्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री विषयी इतर स्पर्धक राखी आणि रितेशला चिडवतात. कारण राखी पहिले स्पर्धकांना सांगत होती की लग्नाला दोन वर्षे झाली आहेत आणि रितेश परदेशात अडकला आहे तर ती ‘बिग बॉस १४’ मध्ये आली होती. तर आता ती बोलते की मोनालिसाचं लग्न आणि पहिल्या रात्री प्रमाणे राखीसोबत पण बिग बॉस असं काही होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या