छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉसचे १५वे पर्व सुरु आहे. या पर्वातील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा आणि उमर रियाज यांच्यामध्ये चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळते. ते सतत बिग बॉसच्या घरात मजामस्ती करताना दिसतात. दरम्यान, बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्वी करणला वॉशरुममध्ये बोलवत असल्याचे दिसत आहे. ते पाहून उमर करणची खिल्ली उडवतो.

नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये राजीव, करण आणि उमर गार्डन एरियामध्ये चालत असल्याचे दिसत होते. तसेच लंबी जुदाई गाण्यावर डान्स करताना दिसत होते. दरम्यान, तेजस्वी बाथरुममधून करणला आवाज देते आणि ड्रेस देण्यास सांगते. करण तिला ड्रेस देतो.
आणखी वाचा : ‘पतीमुळेच हिचे करिअर उद्धवस्त झाले’, तारक मेहतामधील दयाबेनच्या पतीवर संतापले नेटकरी

Bigg Boss 15 : वेदना असह्य होऊ लागल्यामुळे राकेश बापट बिग बॉसच्या घरातून बाहेर
त्यानंतर तेजस्वी तो परिधान करते आणि करणला ड्रेसची फिटिंग निट आहे की नाही हे पाहण्यासाठी बोलावते. तेवढ्यात मागून उमर करणला चिडवताना दिसतो. ‘दरवाजा बंद करुन घे’ असे तो म्हणतो. करण आणि तेजस्वी यांच्यामध्ये हळूहळू जवळीक निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही एपिसोडमध्ये तेजस्वी आणि करण यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच त्यांच्यामध्ये हळूहळू जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे घरातील कॅप्टन उमर रियाज आणि प्रतीक सहजपाल यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळते.