‘बिग बॉस ३’ फेम अभिनेता अविष्कार दार्वेकर पुन्हा अडकला विवाहबंधनात, दुसऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला….

त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस ३’ फेम अभिनेता अविष्कार दार्वेकर पुन्हा अडकला विवाहबंधनात, दुसऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला….
अविष्कार दार्वेकर

अभिनेता अविष्कार दार्वेकर हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वामुळे तो खरा प्रसिद्धीझोतात आला होता. बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेला अविष्कार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियावर याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे.
समीर वानखेडेंना क्लीनचीट मिळाल्यानंतर क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

अविष्कार हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत अविष्कार हा त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत पाहायला मिळत आहे. ते दोघेही बर्फाच्छादित प्रदेशात फिरायला गेल्याचे पाहायला मिळत आहेत. त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोंना कॅप्शन देताना तो म्हणाला, “तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. खूप खूप प्रेम. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला पुढे पाऊल टाकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतात.” अविष्कारने शेअर केलेल्या या फोटोंमुळे त्याने पुन्हा एकदा लग्न केल्याचे बोललं जात आहे. अविष्कारच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय? ती कोण आहे? काय करते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

“हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी…” मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याने सुमीत राघवन संतापला

दरम्यान अविष्कार दार्वेकर याने यापूर्वी एक लग्न केले होते. अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्यासोबत तो विवाहबंधनात अडकला होता. त्यावेळी स्नेहा ही १९ वर्षांची होती. पण त्यावेळी त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्या दोघांनी घटस्फोट घेतला. ‘माझं अविष्कारासोबत खूपच कमी वयात लग्न झाले होते. काहीही कारण काढून तो मला मारहाण करायचा. माझ्या चेहऱ्यावर त्यांनी मारहाण केल्याचे देखील अनेकांनी पाहिलेत. सगळ्यांना त्यातले सगळे माहित आहे पण कोणीही काही बोलत नव्हते, असे स्नेहाने याबाबत खुलासा करताना म्हटले होते.

बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात अविष्कार आणि स्नेहा हे स्पर्धक म्हणून एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे ते पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे बोललं जात होतं. मात्र नंतर स्नेहाने या सर्व अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss fame actor avishkar darvekar second marriage wife photo viral on social media nrp

Next Story
अजित पवार यांची आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर प्रतिक्रिया, म्हणाले “चित्रपट बॉयकॉट करावा असं…”
फोटो गॅलरी