छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला बिग बॉस ओटीटी हा कार्यक्रमही तितकाच चर्चेत असतो. बिग बॉस ओटीटीमधील सर्वच स्पर्धक हे काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस ओटीटी’च्या विजेतेपदावर दिव्या अग्रवालने आपलं नाव कोरलं. दिव्या ही बिग बॉसनंतर प्रसिद्धीझोतात आली असली तरी ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच दिव्याने बाथरुममधील फोटोशूटचा एका व्हिडीओ शेअर केला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’ हा शो जिंकल्यापासून दिव्या अग्रवाल सतत चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. दिव्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतंच दिव्याने बाथरुममध्ये एक फोटोशूट केले आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दिव्याने याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती बाथरुममध्ये फोटोशूट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटोशूट करतेवेळी दिव्याने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यासोबत तिने न्यूड शेडमध्ये मेकअप केला असून त्यासोबत लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे.

दिव्याच्या या फोटोशूटचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात ती बाथटबबाहेर बोल्ड लूक देताना दिसत आहे. तिने या व्हिडीओला अनोखे कॅप्शन दिले आहे. कारण हे ट्रेंडींग आहे, असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.