बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी तेथील नियमांचे उल्लंघन करणे ही काही नवी बाब नाही. पण, यावेळेस सदस्यांना याची शिक्षा भोगावी लागणार आहे. वेळोवेळी बिग बॉसने सांगूनही नियमांचे उल्लंघन केल्याने २४ तासांसाठी घरातील स्वयंपाकगृह बंद करण्यात येणार आहे. या घरात संभाषणासाठी केवळ हिंदी भाषाच वापरली जावी, असा नियम आहे. मात्र, वारंवार सांगूनही हे सदस्य इंग्रजीत संभाषण करताना आढळले आहेत. अरमान-तनिषा, कुशाल-गौहर हे चारही सदस्य बहुतेकवेळेस इंग्रजीत बोलत असल्याचे बिग बॉसने सांगितले.

घरातील दिवे विझवल्यावर त्यांचे माइक्स बंद करण्यात येतात. त्यानंतर हे चौघेही संभाषणासाठी इंग्रजी भाषेचा वापर करत असल्याचे आढळले.तसेच, नॉमिनेशन प्रक्रियेबाबतही चर्चा करण्यास परवानगी नसताना सदस्य याबाबत चर्चा करतात. पण, तरीही अनेकदा चूक सुधारण्याची संधी देऊनही सदस्यांनी नियमांचे उल्लंघन करणे थांबवले नाही. त्यामुळे २४ तासांसाठी या सर्वांना उपाशी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.