आपल्या विचित्र फॅशनमुळे उर्भी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. याच विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोधही केला जातो. विचित्र वाटणारे वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्ला अनेकजण तिला देतात. तर काही जण तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीकरतात. दरम्यान, आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यादेखील उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत त्यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या अटकेची मागणी करणारे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांनादेखील टॅग केले आहे. “अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतआहे,” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींना ट्रोल करण्यासाठी भाजपाकडून उर्फी जावेदच्या नावाचा वापर करण्यात आला होता. राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी गुजरातमधील एका भाजपा कार्यकर्त्याने एक ट्वीट केले होते. या ट्वीटमुळे उर्फी चांगलीच भडकली होती. या ट्वीटवर तिनं आक्रमक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले होते. तसेच, आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला होता. उर्फीच्या या भूमिकेनंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.