छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रुती सेठ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रुती सेठ सध्या तिच्या आगामी ‘ब्लडी ब्रदर्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ही वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘ब्लडी ब्रदर्स’मध्ये अभिनेत्री मुग्धा गोडसेसोबत श्रुतीने किसिंग सीन दिला आहे. आता श्रुतीने मुग्धासोबत किसिंग सीन करण्यावर मोठे वक्तव्य केले आहे.

श्रुती सध्या ‘ब्लडी ब्रदर्स’ या वेब सीरिजचे प्रमोशन करत आहे. या सीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने मुग्धा गोडसेसोबतच्या तिच्या किसिंग सीनबद्दल सांगितले. श्रुतीने या सीनला विनोदी असल्याचे म्हटले आहे. श्रुतीने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली यावेळी तिने किसवर वक्तव्य केलं. “दोघींसाठी हे खूपच विनोदी होते. कारण आम्ही असे सीन यापूर्वी कधीही केले नव्हते, पण शाद अलीने ते अगदी सहजपण आमच्याकडून करून घेतले.”

आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

पुढे श्रुतीला विचारले की “आपले प्रेक्षक अशी दृश्ये स्वीकारण्यासाठी पूर्णपणे प्रगतीशील आहेत का?” यावर श्रुती म्हणाली, “जिथे प्रेक्षकांचा प्रश्न आहे. आम्हाला ते पाहण्यासाठी आणि त्यांचा निर्णय जाणून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.”

आणखी वाचा : “घाई-घाईत बेडरूममधून…”, डीप नेक ड्रेसमुळे समांथा रुथ प्रभू झाली ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘ब्लडी ब्रदर्स’ या वेब सिरीजबद्दल सांगायचे तर, यात श्रुती सेठसह जयदीप अहलावत आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय सतीश कौशिक, टीना देसाई, जितेंद्र जोशी, माया अलग, मुग्धा गोडसे आणि युरी सुरी सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. ‘ब्लडी ब्रदर्स’ ही वेब सिरीज १८ मार्च रोजी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.