ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. एका महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी खेर यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे सध्या अनेकांनीच या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरच्या माध्यमातून याबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचताच कलाविश्वातील दिग्गजांनी खेर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, अशोक पंडीत यांनी ट्विटरच्या माध्यमातून खेर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनीही त्यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी या निर्णयाबद्दल माहिती व सूचना प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचेही आभार मानले आहेत.

तत्पूर्वी २०१५ मध्ये गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, सर्वच स्तरांतून त्यांचा विरोध करण्याच आला होता. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनीही त्यावेळी चौहान यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. ही सर्व परिस्थिती पाहता सध्या घेण्यात आलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया अकेनांनीच व्यक्त केली आहे. खेर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचं कळताच ट्विटरवरही #anupamkher आणि #FTII असे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आले आहेत.

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती होणाऱ्या खेर यांच्या कारकिर्दीचा आलेख पाहिला तर अनेकांनाच त्याचा हेवा वाटेल. त्यांनी आतापर्यंत ५००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रुपेरी पडदा आणि रंगमंचावरील अभिनयावर त्यांचं प्रभुत्त्व आहे. याशिवाय कला, राजकारण आणि सामाजिक कामांमध्येही त्यांचा मोलाचा सहभाग असतो. त्यामुळे एका महत्त्वाच्या पदासाठी सुयोग्य व्यक्तीचीच निवड झाल्याचं मत मांडत अनेकांनीच आनंद व्यक्त केला आहे.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor anupam kher appointed new ftii chairman reactions on social media kirron kher
First published on: 11-10-2017 at 15:43 IST