२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दुसऱ्यांदा समन्स बजावूनही जॅकलिन फर्नांडिस गैरहजर

३० ऑगस्ट रोजी जॅकलीनची दिल्लीत ६ तास चौकशी करण्यात आली होती.

Jacqueline-Fernandez
(Photo-Instagram@Jacqueline Fernandez)

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर सापडल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलीनची दिल्लीत ६ तास चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी जॅकलिनला शनिवारी ईडीसमोर हजर रहावे लागणार लागणार होते. मात्र जॅकलिन या चौकशीसाठी दुसऱ्यांदा गैरहजर राहिली. यापूर्वी २५ सप्टेंबर रोजी देखील जॅकलिन गैरहजर होती.

दिल्लीतील ईडी कार्यालयात जॅकलिनने चौकशीसाठी हजर राहावे यासाठी तिला दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र या चौकशीसाठी जॅकलिन गैरहजर राहिल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इंडिया टूडेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनने तिच्या प्रोफेशनल आयुष्यातील कमिटमेंट्समुळे दुसऱ्यांदा चौकशीला गैरहजर राहत असल्याचे सांगितले. शुक्रवारी जॅकलिनने पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे तिची लवकरात लवकरच चौकशी व्हावी याकडे लक्ष दिले जात आहे.

आणखी वाचा: ‘बाई दोन थोबाडीत मार पण प्रवचन देऊ नकोस’, ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर भन्नाट मीम्स व्हायरल

३० ऑगस्ट रोजी जॅकलीनची दिल्लीत ६ तास चौकशी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची कल्पना देखील नव्हती’, असे जॅकलिन म्हणाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actor jacqueline fernandez skips ed summons for second time in extortion case avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या