आमच्या रिलेशनशिपचा रिअॅलिटी शो नको- रणबीर कपूर

‘राजी’ फेम अभिनेत्री आलिया भट्ट हिला रणबीर गेल्या काही दिवसांपासून डेट करत आहे.

ranbir kapoor, alia bhatt
आलिया भट्ट, रणबीर कपूर, ranbir kapoor, alia bhatt

अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘संजू’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. रणबीरचा हा चित्रपट कलाविश्वात चर्चेचा विषय ठरतोय खरा. पण, त्यासोबतच या ‘सावरिया’ अभिनेत्याच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच गोष्टींचा खुलासा होत आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने रणबीरला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये त्याच्या खासगी आयुष्याविषयीचे प्रश्न तुलनेने जास्त आहेत.

‘राजी’ फेम अभिनेत्री आलिया भट्ट हिला रणबीर गेल्या काही दिवसांपासून डेट करत आहे. त्याने स्वत: आलियासोबतच्या रिलेशनशिपची कबुली ‘जीक्यू’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली. त्यामुळे एकंदर या सेलिब्रिटी कपलचं नातं पाहता ते कोणापासूनही सत्य लपवून ठेवत नाही आहेत, हे स्पष्ट होत आहे.

एखाद्या गोष्टीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देत त्याची चेष्टा करणं हे मात्र रणबीरला पटत नाहीये. ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने याविषयीचा खुलासा केला. ‘चित्रपटाच्या प्रमोशनच्याच वेळी मी बोलतो. त्याचवेळी मी रिलेशनशिपमध्ये असेन आणि मला कोणी त्याविषयी प्रश्न विचारला तर, अर्थातच मी त्या प्रश्नाचं उत्तर देईन. अनेकदा असं होतं, की तुम्ही आणि तुमच्या सोबत असलेली व्यक्ती त्याविषयी काहीही न बोलणं उत्तम समजता, अनेकदा त्याविषयी उघडपणे बोलता. कारण रिलेशनशिपमध्ये लपवण्यासारखं नसतंच मुळी काही. मुळात आम्हाला रिलेशनशिपची खिल्ली उडवायची नाही, त्याला रिअॅलिची शो करायचं नाहीये’, असं रणबीर म्हणाला.

वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ‘ही’ युक्ती

आलियासोबतच्या नात्याविषयी सांगत रणबीरने आपल्या खासगी आयुष्याप्रती पाळण्यात आलेल्या गुप्ततेचा इतरांनी आदर करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. आपल्या नात्याविषयी फार चर्चा करुन त्याला एखाद्या रिअलिटी शोचा दर्जा देण्याची आपली मुळीच इच्छा नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood actor ranbir kapoor and actress alia bhatt do not want their relationship to become a reality show

ताज्या बातम्या