देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळ राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे महापूराचा तडाखा बसला. जवळपास महिनाभरापासून पावसाचा कहर सुरु असल्यामुळे केरळमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन, अनेकांनाच यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. केरळमधील या आपत्तीनंतर या राज्याच्या मदतीसाठी अनेकांनीच सढळ हस्ते मदत केली. कलाकार मंडळीही यामध्ये मागे राहिले नाहीत. बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, सुशांत सिंह राजपूत या सर्वच कलाकारांनी केरळला आर्थिक मदत देऊ केली. या सर्वच कलाकारांमध्ये सध्या प्रकाशझोतात आला तो म्हणजे अभिनेता रणदीप हुडा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावरुन ट्विट किंवा फक्त आपल्या वतीने केरळात मदत न पाठवता रणदीप स्वत: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्या भूमीत पोहोचला. खासला एड, या संस्थेच्या मदतीने त्यानेही पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी आपल्या परिने मदतीचा हात पुढे केला.

वाचा : Kerala Floods BLOG : ओणमच्या निमित्ताने साजरा होणार उत्सव माणुसकीचा, माणसातल्या देवाचा

‘खालसा एड’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लंगरदरम्यानचा एक फोटो पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये रणदीप पूरग्रस्तांना जेवण वाढत असल्याचं पाहायला मिळालं. सेलिब्रिटी असतानाही समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी ओळखून रणदीपने केलेल्या या सेवेबद्दल खालसा एडकडूनही त्याचे आभार मानण्यात आले आहेत.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

अभिनय क्षेत्रात आपल्या कलेच्या बळावर प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्याने आतापर्यंत बऱ्याचदा समाजसेवी कामांमध्ये आपलं योगदान दिलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या काही मोहिमांमध्येही तो हिरीरिने सहभागी होतो. दरम्यान, केरळच्या पूरग्रस्तांसाठी शीख समुदायाकडून मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती बिघडत असल्याचं लक्षात येताच या समुदायातील काही मंडळींनी थेट केरळमध्येच जात घटनास्थळी पूरग्रस्तांना आधार देत या राज्याला एक प्रकारे आधार दिला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor randeep hooda joins kerala floods relief work is seen serving food to the needy see photo
First published on: 24-08-2018 at 11:57 IST