बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि वादांचे नाते फार जुने आहे. हिट अँण्ड रन खटला असो किंवा काळवीट शिकार प्रकरण असो, सलमानला या सगळ्यामुळे अनेकदा कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानने कंकणीजवळ काळवीटाची शिकार केली होती. दुर्मिळ प्रजातीच्या या काळवीटाच्या शिकारीवर सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे सलमानविरुद्ध गुन्हा दाखल होऊन न्यायालयात त्याच्यावर खटला चालवण्यात आला. तब्बल १९ वर्षांनी या आरोपांतून सलमानची निर्दोष मुक्तता झाली. तेव्हापासून या प्रकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.

मात्र, सध्या अचानक सलमान आणि काळवीट शिकार प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ. ‘देसीट्यूब’ या युटयूब चॅनलवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या अनेकांचं लक्ष वेधतोय. यामध्ये एक सरकारी अधिकारी सलमानची चौकशी करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

याशिवाय, सलमान काही कागदपत्रांवर सह्या करतानाही व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ १३ ऑक्टोबर १९९८ या दिवशी रेकॉर्ड झाल्याचे सांगण्यात येतेय. या व्हिडिओच्या आवाजाचा दर्जा चांगला नसल्यामुळे अधिकारी आणि सलमानमधील संभाषण स्पष्टपणे ऐकू येत नाही. तरीही सोशल मीडियावर अनेकांकडून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.