देशभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. परंतु हातावर पोट असणाऱ्या कामगारांना यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोरही मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यांच्यासाठी अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच आता बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण देवदुतासारखा धावून आला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी अजय देवगणनं तब्बल ५१ लाखांचा निधी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“FWICE चे मुख्य सल्लागार आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली. चित्रपट सृष्टीतील पाच लाख कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी ५१ लाखांचा निधी दिल्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही प्रत्येक वेळी संकटसमयी मदतीसाठी धावून आला आहात. तुम्ही खरंच सिंघम आहात,” असा संदेश अशोक पंडित यांनी दिला आहे.

Dear @ajaydevgn, we thank U for your generous contribution of ₹51 lakhs towards @fwice_mum, for the benefit of our 5 lakh #CineWorkers. U have proved time & again, especially in times of crisis, that U are a real life #Singham. God bless U.#FWICEFightsCorona #IndiaFightsCorona pic.twitter.com/e2NZ0V3q52

अजय देवगणने ५१ लाखांचा जो निधी दिला आहे त्याचा वापर कामगार, तंत्रज्ञ आणि निरनिराळ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केला जाणार आहे, असं पंडित यांनी नमूद केलं. याव्यतिरिक्त त्यांनी चित्रपटसृष्टीतील अन्य कलाकारांनाही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. अजय देवगण यांच्यापूर्वी चित्रपट निर्माता रोहीत शेट्टी यानंदेखील ५१ लाखांचा निधी दिला होता. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कलाकारही कामगारांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. तर दुसरीकडे अभिनेता सलमान खानंही FWICE कडे २५ हजार कामगारांचे अकाउंट नंबर मागितले आहेत. याद्वारे थेट त्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अक्षय कुमारनंही पंतप्रधान मदत निधीमध्ये २५ कोटी रूपयांचा निधी दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor singham ajay devgan donates 51 lakhs for film industry employee fwice ashok pandit gave information jud
First published on: 02-04-2020 at 10:20 IST