सेलिब्रिटी चॅट शोमधून नेहमीच सेलिब्रिटींविषयी काही धम्माल गोष्टी कळतात. अशाच एका चॅट शोमध्ये दीपिकाने हजेरी लावली होती. यावेळी गप्पा मारण्याच्या ओघात सूत्रसंचालकाने दीपिकाला रणबीरविषयी एक प्रश्न विचारला. तेव्हा तिने आपण रणबीरविषयी केलेलं वक्तव्य ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तिच्या मुलाखतीमधील हा भाग नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

‘स्टारी नाइट्स’ या कार्यक्रमात गप्पांच्या ओघातच दीपिकावर एक मजेशीर आरोप करण्यात आला. ‘रणवीरने असं सांगितलंय की, तू त्याला तासातासाला फोन करत असतेस’. त्यावर थक्क होऊन दीपिकाने हे खोटं असल्याचं सांगितलं. ‘मला यावर विश्वासच बसत नाहीये, ही अफवा आहे. मी रणवीरला का फोन करेन, त्याच्यापेक्षा मी दुसऱ्या कोणाला फोन करेन. दुसऱ्या कोणाला फोन करेन’, असं जेव्हा ती म्हणाली तेव्हा सूत्रसंचालकाने लगेचच रणबीर कपूरचं नाव सुचवलं. त्यावर दीपिकाने ‘आय विश….’ असं म्हणत रणबीरला फोन करण्याची, त्याच्यासोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिका आणि रणबीरमध्ये ब्रेकअप होवून आता बऱ्याच वर्षांचा काळ लोटला आहे. पण, या जोडीमध्ये आजही मैत्रीचं नातं कायम आहे. रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका अभिनेता रणवीर सिंगला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता रणवीरला हे एकून नेमकं कसं वाटेल, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण दीपिकाने ज्या उत्साहात रणबीरसोबत बोलण्याची आणि त्याच्यासोबत संपर्कात असण्याची इच्छा व्यक्त केली, ते पाहता अनेकजण थक्क झाले आहेत.