‘चाची ४२० ‘ हा चित्रपट त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात तब्बू आणि कमल हसनसोबत फातिमाचीही महत्वाची भूमिका होती. यामध्ये फातिमाने भारती रतन या बालकलाकाराची भूमिका वठविली होती. सध्या फातिमाने ‘चाची ४२०’ मधला एक फोटो शेअर केला असून ‘थ्रोबॅक’ असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. तिच्या या कॅप्शनमुळे फातिमानेच भारती रतनची भूमिका साकारली होती, हे स्पष्ट झालं आहे.
फातिमाने मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटामध्ये तिने कुस्तीपटू गीता फोगटची भूमिका साकारली होती. फातिमाच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर फातिमाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘चाची ४२०’ मुळे फेमस झालेल्या फातिमाने बालकलाकार म्हणून अभिनेत्री जुही चावलाच्या ‘वन टू का फोर’, ‘बिट्टू बॉस’ आणि ‘आकाशवाणी’ चित्रपटात देखील काम केले होते.