फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडमधील कलाकार मंडळी नेहमीच सजग असतात. विविध भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी आपल्या शरीरयष्टीकडे, फिटनेसकडे या कलाकारांना विशेष लक्ष द्यावे लागते. अनेकदा भूमिकेची गरज म्हणून त्यांना वजन वाढवावे लागते किंवा कमी करावे लागते. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर ‘दंगल’ चित्रपटासाठी आमिर खानने नुकतेच वजन वाढवले आणि कमीसुद्धा केले. बाळंतपणानंतर बेबो म्हणजेच करिना कपूरनेही अगदी कमी कालावधीत वाढलेले वजन कमी केले. मात्र हे सर्व करण्यासाठी खूप मेहनत, एकाग्रता आणि त्यासोबतच योग्य मार्गदर्शनाचीही गरज असते. फिटनेस ट्रेनरकडून मिळालेल्या अचूक मार्गदर्शनामुळे ही कलाकार मंडळी निरोगी मार्गाने आपले ध्येय साध्य करताना दिसतात.
अभिनेत्री मलायका अरोरापासून ते कतरिना कैफपर्यंत त्यांच्या प्रशिक्षकांचीही तेवढीच मेहनत फिटनेसमागे आहे. या फिटनेस प्रशिक्षकांना पडद्यामागील हिरो म्हणायला हरकत नाही. सेलिब्रिटींच्या या फिटनेस ट्रेनर्सची सत्रांनुसार किती फी आहे याची माहिती आज आपण जाणून घेऊया.
नम्रता पुरोहित Namrata Purohit
नम्रता ही जगातील सर्वांत तरुण स्टॉट पिलाटीस Stott Pilates प्रशिक्षक आहे. त्याचप्रमाणे ती लेखक आणि उद्योजिकादेखील आहे. ती केवळ बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येच नव्हे तर खेळाडूंमध्येही तितकीच प्रसिद्ध आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसपासून क्रिकेटर युवराज सिंगपर्यंत अनेक जणांना तिने फिटनेस ट्रेनिंग दिली आहे. नम्रताकडून फिटनेस ट्रेनिंगसाठी महिन्याभरातील १२ सत्रांसाठी ३२ हजार रुपये तुम्हाला खर्च करावे लागणार.
वाचा : वाढदिवसाच्या निमित्ताने दीपिकासोबत रणवीरचा नव्या कारमधून फेरफटका
यास्मिन कराचीवाला Yasmin Karachiwala
यास्मिन कराचीवाला ही एक फिटनेस तज्ज्ञ असून तब्बल २० वर्षांचा तिला यामध्ये अनुभव आहे. बी-टाऊनमधील जवळपास सर्वच कलाकरांना तिने फिटनेस ट्रेनिंग दिली आहे. या यादीत करिना कपूर खान, बिपाशा बासू, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हाचा समावेश आहे. ‘वॉग फॅशन पुरस्कार’ (Vogue Fashion Awards 2013) २०१३मध्ये तिचा ‘उत्कृष्ट फिटनेस प्रशिक्षक’चा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कराचीवालाच्या एका सत्रासाठी तुम्हाला १,९०० रुपये तर १२ सत्रांसाठी १९,५०० रुपये खर्च करावे लागणार.
अनुष्का पारवानी Anshuka Parwani
शहरातील काही एरियल योग तज्ज्ञांमध्ये अनुष्का पारवानीचाही समावेश आहे. अँटी ग्रॅव्हिटी योगा Anti-gravity yoga आणि एरियल पिलाटीससाठी Aerial Pilates अनुष्का प्रसिद्ध आहे. मलायका अरोराची ही आवडती योग प्रशिक्षक असून तैमुरच्या जन्मानंतर कमी काळात करिनाच्या वजन घटण्यामागचे कारण अनुष्काच आहे. अनुष्काच्या १२ सत्रांसाठी ३६ हजार रुपयांचा खर्च येईल.
सिंडी जॉर्डेन Cindy Jourdain
नृत्याद्वारेसुद्धा तुम्ही फिट राहू शकता हे सिंडी आपल्याला पटवून देते. योग, क्रॉस फिट, मार्शल आर्ट्स आणि बॅले यांचे अप्रतिम फ्युजन शिकवण्यात सिंडी प्रसिद्ध आहे. कतरिना कैफचे घायाळ करणारे बिकिनीमधील फोटोंच्या फिटनेसमागे सिंडीचा हातभार आहे. तुम्हालाही तशी फिगर हवी असल्यास सिंडीच्या एका सत्रासाठी १,२०० रुपये आणि १२ सत्रांसाठी १२ हजार रुपये खर्च करावे लागणार.
राधिका कार्ले Radhika Karle
पॅरिस फॅशन वीकमध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या परफेक्ट शरीरयष्टीमागे आहारतज्ज्ञ राधिका कार्लेचीही तेवढीच मेहनत आहे. सोनम कपूरसोबतच हुमा कुरेशीचीही फिटनेस ट्रेनर राधिका कार्ले आहे. योग आणि पिलाटीसचेही प्रशिक्षण ती देते. राधिकाच्या एका सत्रासाठी ५ हजार रुपये आणि एक महिन्याच्या पॅकेजसाठी ४८ हजार रुपयांचा खर्च येईल.
https://www.instagram.com/p/6CYto6KwzW/