भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे अनोखे बंध पाहण्याची संधी नुकतीच सर्वांना मिळाली. दिवाळीच्या उत्सवात पार पडलेल्या भाऊबीजेच्या निमित्ताने अनेक बहीण भावांनी या खास दिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बॉलिवूड सेलिब्रिटीही यात मागे नव्हते. पण, नृत्यदिग्दर्शिका आणि चित्रपट दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फराह खानच्या पतीने मात्र वेगळ्या पद्धतीने भाऊबीज साजरा केल्याचं कळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर भाऊबीजेचा हॅशटॅग ट्रेंडमध्ये असताना अनेकांनीच या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. पण, फराहचा पती शिरीष कुंदर याच्या शुभेच्छा मात्र अनेकांनाच खटकल्या. त्याने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट करत नेटकऱ्यांचा रोष ओढून घेतला. शिरीषने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या खऱ्या. पण, त्यासोबत त्याने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा फोटोही पोस्ट केला.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

शिरीषने हे ट्विट करताच त्याच्यावर अनेकांनी निशाणा साधला. अनेकांनी तर त्याच्या अपयशाचा मुद्दाही अधोरेखित केला. हा तुमच्यासाठी भाई असेल. पण, इतरांसाठी तो गुन्हेगारच आहे, असं ट्विट करत एका युजरने शिरीषला चांगलाच धडा शिकवला. तर त्याच्या विनोदबुद्धीची प्रशंसा करणारं उपरोधिक ट्विट करत आणखी एका युजरने शिरीषचे तीनतेरा वाजवले. अनेकांनी तर शाहरुख आणि शिरीषच्या वादावरही प्रकाश टाकला. तर, भाऊ- बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या या सणाची अशा प्रकारे खिल्ली का उडवत आहेस, असा सवाल करत आपल्या सण- उत्सवांचा हा अपमानच आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे चुकीचं ट्विट करत उगाचच आपली विनोदबुद्धी सर्वांसमोर आणणं शिरीषला महागात पडलं आहे असंच म्हणावं लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood choreographer farah khan husband shirish kunder gets trolled on twitter after he tweets about bhai dauj
First published on: 22-10-2017 at 14:08 IST