बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबार झाला होता. दुचाकीवर आलेल्या दोघांनी घरावर गोळ्या झाडल्या होत्या. या बातमीने सगळीकडे खळबळ माजली होती. हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी अरबाज खानने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पहिल्यांदाच खान कुटुंबातर्फे भाष्य केलं होतं. सलमानची बहीण अर्पिता आणि तिच्या पतीने या घटनेनंतर सलमानची भेट घेतली होती.

सध्या आयुष शर्मा त्याचा आगामी चित्रपट ‘रुस्लान’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने पहिल्यांदाच सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबाराबद्दल भाष्य केलं.

हेही वाचा… सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अरबाज खानची पहिली पोस्ट; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने काही लोक…”

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत आयुष शर्मा म्हणाला, “आम्ही त्याचं कुटुंब आहोत. हा काळ आमच्यासाठी खूप कठीण आहे आणि या कठीण काळात आम्ही सर्व एक कुटुंब म्हणून एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत.”

आयुष पुढे म्हणाला, “मला असं वाटतं की या क्षणी, या विषयावर कोणतंही विधान किंवा टिप्पणी देणं योग्य ठरणार नाही कारण ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सक्षम असलेले मुंबई पोलिस या प्रकरणात उत्तम कामगिरी बजावत आहेत आणि हे प्रकरण अद्याप तपासात आहे. म्हणून या टप्प्यावर मी फक्त तुम्हाला धन्यवाद देईन, ज्यांनी या कठीण काळात त्यांचं प्रेम दिलं, आमच्यासाठी प्रार्थना केली, त्यांना खरंच खूप धन्यवाद. जसं तुम्हा सर्वांना माहीत आहे की, या घटनेनंतर तो (सलमान) पुन्हा एकदा कामावर परतला आहे, तसाच मीही परतलो आहे.”

हेही वाचा… चेतन वडनेरे आणि ऋतुजा धारप अडकले लग्नबंधनात; शेअर केले खास फोटोज

या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्याच्या निवासस्थानी भेट दिली आणि खान आणि त्यांच्या कुटुंबाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. इंडस्ट्रीमधील अनेक मित्रांनीदेखील सलमान खानची भेट घेतली आणि सलमानबद्दल त्यांचं प्रेम आणि काळजी व्यक्त केली.

हेही वाचा… “मला रोज फोन करतायत”, केदार शिंदे करतात निलेश साबळेला दररोज फोन, म्हणाला…

दरम्यान, आयुष शर्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो २०२१ मध्ये ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये शेवटचा झळकला होता. तीन वर्षांनंतर तो पुन्हा एकदा ‘रुस्लान’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रुस्लान’मध्ये अभिनेत्यासह सुश्री मिश्रा, विद्या मालवडे आणि जगपती बाबू हे कलाकारही दिसणार आहेत.