बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. घोडेस्वारी करताना दुखापत झाल्यामुळे रणदीपला मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी रणदीप हुड्डाला गंभीर दुखापत झाली होती. घोडेस्वारी करताना पडल्यामुळे हुड्डा जखमी झाला होता. त्यानंतर त्याला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हेही वाचा>> “काट लो जुबान…”, किरण मानेंनी शेअर केली स्वत:चीच पोस्ट म्हणाले “बोललो ते करून दाखवलं…”

गेल्या वर्षीही रणदीप हुड्डा सलमान खानच्या राधे चित्रपटासाठी अक्शन सीन्सचे शूटिंग करताना जखमी झाला होता. तेव्हा त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याची सर्जरी करण्यात आली होती. इन्स्पेक्टर अविनाश या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान ही सर्जरी करण्यात आली होती.

हेही वाचा>> अमृता फडणवीसांचा शिव ठाकरेला पाठिंबा, म्हणाल्या “महाराष्ट्राचा..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या रणदीप हुड्डा सावरकर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटलावर हा चित्रपट आधारित असून यात हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणरा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही हुड्डाच करत आहे.