बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. बिपाशा व करण सिंग ग्रोवरला १२ नोव्हेंबरला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या लेकीचं नाव देवी असं ठेवलं आहे. आता बिपाशाने लेकीबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या दोघीही नाचताना दिसत आहेत.

बिपाशा बासूने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बिपाशा ही तिच्या लेकीबरोबर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे बिपाशा ही लेकीबरोबर छान वेळ घालवतानाही दिसत आहे. तिचा हात पकडून बिपाशा तिच्याबरोबर नाचताना दिसत आहे.
आणखी वाचा : नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली “बुद्धीवरची धूळ, जळमटं साफ करुन…”

“देवीबरोबर डान्स करणं, ही सध्या माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती गोष्ट आहे”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : लेकीच्या जन्मानंतर वजन कसं कमी केलं? आलिया भट्ट म्हणाली “माझ्या सासूने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या लेकीचा खास फोटो शेअर केला होता. या फोटोंमध्ये बिपाशा व करणची लेक देवीचा गोंडस चेहरा पाहायला मिळाला. गुलाबी रंगाचा फ्रॉक व हेअरबँड लावून बिपाशाच्या लेकीने गोड स्माइल दिल्याचं फोटोत दिसत होते.