बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिलं जातं. जिनिलीया देशमुख ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिनिलीयाने हिंदीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम करून अभिनयाचा ठसा उमटवला. २०१२मध्ये रितेश देशमुखशी विवाहबंधनात अडकून जिनिलीया देशमुख घराण्याची सून झाली. लग्नानंतर जिनिलीयाने घर आणि मुलांच्या संगोपनावर लक्ष दिलं. आता जिनिलीयाने तिच्या सासूबाईंसाठी खास पोस्ट केली आहे.

जिनिलीया देशमुखची सासू आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने तिच्या सासूबाईंचे आभार मानले आहेत. यात तिने एक फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : “बिकिनीवरती जरतारीचा मोर…” चाहत्याच्या ‘त्या’ कमेंटवर मिताली मयेकरच्या उत्तराने वेधलं लक्ष

“प्रिय आई, एक आधुनिक विचारांची स्त्री कशी असते, हे मला शिकवल्याबद्दल धन्यवाद. माझ्यावर स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम केले यासाठीही तुमचे आभार. माझी मराठी थोडी थोडी सुधारल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी आई झाल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. तुमच्यासारखं दुसरं कुणी असूच शकत नाही”, असे जिनिलीयाने म्हटले आहे.

तर रितेश देशमुखनेही या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो पोस्ट केला आहे. “आई, लव्ह यू!! तू आमचे जीवन आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असे रितेश देशमुखने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी चांगल्या कामाच्या शोधात…” प्रसिद्ध मराठी अभिनेता काम मिळवण्यासाठी करतोय धडपड, म्हणाला “प्रामाणिक प्रयत्न…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रितेश देशमुख आणि जिनिलीया या दोघांच्या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. सध्या त्या दोघांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.